अनैतिक सबंधातून तरुणाचा खुन

धुळे :  पोलीसनामा ऑनलाईन –  मालेगाव तालुक्यात मुंबई धुळे महामार्गावरील चिखलहोळ शिवारात एकाचा अनैतिक संबंधांतून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तर खून करून मृतदेह फेकून दोनजण पसार झाले आहेत.

याप्रकरणी मालेगांव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई- धुळे महामार्गाजवळ चिखलहोळ शिवारात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह मिळून आला होता. याबाबत धुळे पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून धुळे शहर शोध पथकाने मृतदेहाच्या अंगावरील ॐ चिन्ह ‘खिशात सापडलेले बस टिकीट, या आधारे धुळे स्थानिक गुन्हे शाखा नाशिक यांच्या सहकार्याने मयताची ओळख पटविली. तसेच संशयीतांची विचारपुस करुन अवघ्या काही तासात गुन्हा उघडकीस आणला आहे.

त्याची हत्या अनैतिक संबंधातुन २ मार्च रोजी शनी नगर परिसरात करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो मालेगांव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेकून दिला होता. धुळे शहर शोध पथकाने २ जणांना ताब्यात घेऊन नाशिक पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तर इतर आरोपीतांचा शोध सुरु आहे.

ह्याहि बातम्या वाचा –

स्वारगेट परिसरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

एनजीटीसाठी न्यायाधीश व तज्ज्ञांची प्रतिक्षा लवकरच संपणार

कार्ड क्लोनिंग करणाऱ्या नायजेरियन टोळीचा पर्दाफाश

खोट्या सह्या करून अभियंत्याच्या नावावर कर्ज घेऊन फसवणूक

हिंगोली जिल्ह्यातील फरार आरोपी चंदननगर पोलिसांच्या जाळ्यात