Yusuf Lakdawala | मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि ‘डी गँग’चा फायनान्सर युसूफ लकडावालाचा मुंबईच्या जेलमध्ये मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Yusuf Lakdawala | मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि डी गँगचा फायनान्सर (D Gang financier) युसूफ लकडावालाचा (Yusuf Lakdawala) ऑर्थर रोड कारागृहात (Arthur road jail) मृत्यू झाला आहे. लकडावालाला जे जे रुग्णालयात (JJ hospital) नेले, तेथे दाखल करण्यापूर्वी त्याला मृत घोषित करण्यात आले. युसुफ लकडावाला कॅन्सरने (Cancer) त्रस्त होता. एन एम जोशी मार्ग पोलिसांचे (N. M. Joshi Marg Police) एक पथक आर्थर रोड कारागृहात असून डीआरए (DRA) दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रताप भोसले (Senior Police Inspector Pratap Bhosale) यांनी दिली आहे. मनी लाँडरिंगसह पैशाच्या अफरातफरी प्रकरणात ईडीने (ED) त्याला अटक केली होती.

2019 मध्ये जमीन खरेदी प्रकरणी (land purchase case) सरकारी कागदपत्रामध्ये फेरफार करत पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली बिल्डर युसूफ लकडावाला याला (वय-76) अहमदाबाद आर्थिक गुन्हे शाखेने (Ahmedabad Crimes Branch) अटक (Arrest) केली होती. गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरुन (Ahmedabad Airport) लंडनला (London) पळून जाण्याच्या तयारीत असताना लकडावाला याला अटक करण्यात आली होती. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा (dawood ibrahim) आर्थिक व्यवहार सांभाळल्याचा आरोप लकडावालावरती लावण्यात आला होता.

खंडाळ्यातील हैदराबाद नवाबाच्या 50 कोटी रुपयांच्या जमीन खरेदीसाठी बनावट कागदपत्रे बनविल्याच्या
आरोपाप्रकरणी युसूफ लकडावालाची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर युसूफला ईडीकडून
अटक करण्यात आली. या प्रकरणात ट्रायल सुरु असताना त्याला आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले. इथेच
त्याला कॅन्सर असल्याचे निदान झाले. बुधवारी रात्री त्रास झाल्याने जे.जे. रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला
गेला. पण जेजे रुग्णालयातील डॉक्टरांचे मत आहे की, युसूफला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू
झाला होता. आता युसूफच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम केले जाणार आहे.

हे देखील वाचा

Anti Corruption Pune | लाचखोर सहायक पोलिस निरीक्षकासह त्याच्या साथीदाराला ‘एवढया’ दिवसांची पोलिस कोठडी, जाणून घ्या कोर्टात काय झालं

Mansukh Hiren Murder Case | ‘त्या’ दिवशी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंहांच्या केबिनमध्ये होते प्रदीप शर्मा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Yusuf Lakdawala | builder yusuf lakdawala accused in eow case and presently in arthur road jail in a ed case died at jj hospital

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update