युवराजनं सांगितलं कोण झळकवू शकतं T- 20 मध्ये ‘व्दिशतक’, एका भारतीयाचा देखील समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि टी – २० सामन्यात केवळ १२ चेंडूत अर्धशतक जडण्याचे वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या युवराज सिंगने सांगितले की टी-२० क्रिकेटमध्ये द्विशतक देखील होऊ शकते. त्याने हे देखील स्पष्ट केले की अशी कामगिरी कोण करू शकते. त्याने ३ खेळाडूंवर विश्वास दर्शवला आहे. अशी कामगिरी आजपर्यंत कुणीच केली नसून टी-२० इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये १८० पेक्षा जास्त धावा अजून तरी कुणीच केलेल्या नाहीत.

इंटरनॅशनल क्रिकेट मधून संन्यास घेतलेल्या युवराज सिंगने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की येणाऱ्या काळात टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये असा कोणता फलंदाज आहे जो द्विशतक जडेल. वनडे इंटरनॅशनल क्रिकेटला सुरु होऊन ४ दशक पेक्षा अधिक कालावधी झाला आहे, परंतु आजपावेतो फक्त ८ द्विशतक झाले आहेत. जवळपास ४० वर्षांनंतर फिफ्टी – फिफ्टी ओव्हर फॉरमॅटमध्ये सचिन तेंडुलकरने २०१० साली पहिले द्विशतक ठोकले होते. यानंतर वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा (३ वेळा) ख्रिस गेल, मार्टिन गुप्टिल आणि फखर जमान यांनी दुहेरी शतके ठोकली आहेत.

१८० धावांचा वैयक्तिक स्कोर टी-२० सामन्यात कुणीच केला नाही
आंतरराष्ट्रीय टी – २० क्रिकेट सोडाच अजून टी – २० लीग क्रिकेट मध्ये देखील २०० चा स्कोर बनू शकला नाही. एका टी – २० सामन्यात सर्वात जास्त रन ख्रिस गेलच्या नावे आहेत. त्याने आयपीएलच्या एका सामन्यात १७५ रनांची पारी खेळली होती. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर आहे ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार एरॉन फिंच. त्याने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय टी – २० सामन्यात १७२ रनांची पारी खेळली होती. तसेच अफगाणिस्तानचा हजरतुल्लाह जजई याने देखील टी – २० इंटरनॅशनल सामन्यात १६२ रनांची पारी खेळली होती. परंतु दुहेरी शतक करणे कुणालाच जमले नाही. युवराजला देखील टी – २० सामन्यात दुहेरी शतक करणे हे कठीण वाटते.

मुलाखतीदरम्यान युवराज सिंगने सांगितले की ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स टी-२० सामन्यात दुहेरी शतक करू शकतात, तसेच तो म्हणाला की, ‘मला वाटते की टी-२० सामन्यात दुहेरी शतक करणे हे खूप अवघड काम आहे, परंतु हे काम अशक्य देखील नाही. हे दोन्ही ज्या पद्धतीने आपल्या खेळीचे प्रदर्शन करत आहेत त्यानुसार दुहेरी शतक होणे अशक्य नाही. तर थांबा आणि पहा की कोण दुहेरी शतक झळकावते. होय, ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स हे काम करू शकतात. तिसरे नाव रोहित शर्माचे आहे जो टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात दुहेरी शतक करू शकतो.’