‘सिक्सर किंग’ युवराजने कॅटरिनाचे ‘गोडवे’ गायल्यानंतर सलमान खानने दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय क्रिकेट स्टार युवराज सिंगने आज आपल्या क्रिकेट करिअरमधून निवृत्ती घेतली आहे. युवराजने मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमधून निवृत्त घेण्याबद्दल घोषणा केली होती. युवराजच्या निवृत्तीसोबतच त्याच्याशी निगडीत अनेक आठवणी ताज्या झाल्या आहेत.

अशीच एक आठवण समोर आली आहे. या टीव्ही शोमध्ये सलमान खानने युवरजला विचारले होते की, तुझी आवडती अ‍ॅक्ट्रेस कोण आहे ? यावर युवराजने क्षणाचाही विलंब न लावता कॅटरीना कैफ असे नाव घेतले होते. यावेळी सलमान खानची रिअॅक्शन पाहण्यालायक झाली होती.

हा किस्सा 2008 सालचा आहे. 10 का दम या टीव्ही शोमध्ये सलमान खानने युवराज सिंगला प्रश्न विचारला होता. सलमान खान या शोचा होस्ट होता. या शोमध्ये युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनी गेस्ट म्हणून या शो ला उपस्थिती दाखवली होती. आज जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून युवराजने निवृत्ती घेण्याची घोषणा केली त्यानंतर युवराज सिंगचा हा व्हिडीओ लोक सध्या पाहत आहेत. हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे.

युवराज सिंगने आपल्या निवृत्तीची घोषणा करत म्हटले होते की, “25 वर्ष 22 यार्ड आणि जवळपास 17 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घालवल्यानंतर मी आता पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. कसं लढायचं असतं आणि पडल्यानंतर उठून पुन्हा पुढे कसं जायचं असतं ते मी या खेळातून शिकलो आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, मी भारतासाठी 400 मॅच खेळलो. जेव्हा मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती तेव्हा मी अशी कल्पनाही केली नव्हती.

आरोग्य विषयक वृत्त  –

नकळत होणाऱ्या ‘ह्या’ वेदनांकडे दुर्लक्ष करणे बेतू शकते ‘जीवावर’

दुर्लक्ष करू नका, ‘सायलेन्ट हार्ट अटॅक’ची लक्षणे जाणून घ्या

माणसाच्या पोटात ‘मायक्रोप्लास्टिक’चे कण जाण्याचे प्रमाण चिंताजनक

गॅस, अ‍ॅसिडिटी टाळण्यासाठी करा ‘ही’ एक्सरसाइज ; मिळेल आराम