Yuzvendra Chahal | ‘आता सिलेक्टर्सना चांगलंच समजलं असेल’ ! T-20 वर्ल्ड कप संघातून वगळल्यानंतर युजवेंद्र चहलची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Yuzvendra Chahal | नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कप 2021 (T-20 World Cup) स्पर्धेत भारताला अत्यंत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीसुद्धा गाठता आली नाही. यानंतर टीममध्ये कोणत्या खेळाडूंची कमतरता प्रामुख्याने जाणवली यावर चर्चा करण्यात आली. या स्पर्धेत स्पिनर युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) कमतरता भारतीय संघाला प्रामुख्याने जाणवली.

 

खरं तर आयपीएलमध्ये (IPL) धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या युजवेंद्रचा समावेश टी-20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये केला गेला नाही तेव्हा अनेकांना धक्काच बसला होता. युजवेंद्रला (Yuzvendra Chahal) कॅप्टन विराट कोहलीचं (Virat Kohli) ट्रम्प कार्ड मानलं जाते पण या स्पर्धेत मात्र त्याला संघामध्ये स्थान देण्यात आले नव्हते. यानंतर सिलेक्टर्सच्या हट्टामुळे टीम इंडियाचे एकामागोमाग एक लाजिरवाणे पराभव झाले अशी टीका करण्यात आली. यावर आता युजवेंद्र चहलने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

टी-20 मध्ये भारत हा सुपरपॉवर मानला जातो. या वेळच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये यूएईच्या पीचवर वरुण चक्रवर्तीच्या (Varun Chakraborty) स्पिनची जादू चालली नाही.
रविचंद्रन अश्विनही (Ravichandran Ashwin) टीमला मदत करू शकला नाही.
राहुल चहरला (Rahul Chahar) तर संपूर्ण स्पर्धेत फक्त एकच मॅच खेळण्याची संधी मिळाली आणि युजवेंद्रला तर संधीच मिळाली नाही.
गेल्या चार वर्षांत एकदाही ड्रॉप न मिळालेल्या, चांगलं खेळणाऱ्या खेळाडूला फक्त स्वत:च्या हट्टापायी टीममधून वगळलं तर त्याचे परिणाम काय होतात
हे आता सिलेक्टर्सना चांगलंच समजलं असेल, अशी भावना युजवेंद्र चहलने व्यक्त केली आहे.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याला टीमबाहेर ठेवल्यानंतर आता पुन्हा युजवेंद्रचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
17 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) सुरू होणाऱ्या तीन मॅचच्या टी-20 सीरिजसाठी त्याची निवड करण्यात आली आहे.

 

Web Title :- Yuzvendra Chahal | yuzvendra chahal says he felt really bad and sad for 2 days after not getting into t20 world cup 2021 team

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा 

IND vs NZ T20 Series | भारताविरुद्धच्या T – 20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; केन विलियम्सन नाही तर ‘हा’ खेळाडू असणार न्यूझीलंडचा कर्णधार

PM Kisan | पीएम किसान योजनेची रिफंड यादी जाहीर; तुमचे नाव आहे का? चेक करा

Sapna Chaudhary | प्रदर्शित होताच सपना चौधरीचा अल्बन साँग ‘अलट-पलट’ झाला सुपरहिट (व्हिडिओ)

Hardik Pandya | ‘माझ्याबद्दल खोटी माहिती पसरवली जातीय’ हार्दिक पांड्याचा ट्विटरद्वारे खुलासा; म्हणाला…