Zero Waste Wedding Baramati | बारामतीत पार पडला कचरा विरहीत लग्नसोहळा

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Zero Waste Wedding Baramati | अनेक लोक आपल्या मुलाचा, मुलीचा विवाह धुमधडाक्यात पार पाडत (Zero Waste Wedding Baramati) असतात. परंतु, अगदी मोजकेच लोक मात्र लग्न सोहळे हे समाजापुढे एक आदर्श निर्माण करणारे असतात. याचंच एक उदाहरण म्हणजे बारामतीतील एका लग्नसोहळ्याच्या (Wedding ceremonies) निमित्ताने आला आहे. बारामती नगरपरिषदेचे (Baramati Municipal Council) कर्मचारी सचिन खोरे (Sachin Khore) यांनी आपल्या विवाहसोहळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा उत्सर्जित होणार नाही याची काळजी घेत एक वेगळा आदर्श समोर ठेवला आहे. या विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा आहे.

हा झालेला विवाह सोहळा लाखो रुपयांचा खर्च करून होणाऱ्या सोहळ्यापेक्षा अनोखा ठरला आहे. सचिन कोरे यांनी कचरा विरहीत लग्न सोहळा ही संकल्पना राबवत आदर्श निर्माण केला आहे. तर, बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे (Mahesh Rokade) यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन खोरे (Sachin Khore) यांनी स्वत:च्या लग्नसोहळ्यात एक वेगळी परंपरा निर्माण केलीय. या विवाहामध्ये फक्त शून्य कचरा उत्सर्जित होण्यास प्रतिबंध करण्यात आला. त्याचबरोबर विवाह सोहळ्याला उपस्थित मान्यवरांना स्वच्छतेची शपथ दिली गेली. (Zero Waste Wedding Baramati)

दरम्यान, बारामतीत मागील काही दिवसांपासून स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची मोहीम राबवली जातेय. या पार्श्वभुमीवर प्लॅस्टिक निर्मूलनासाठी दंडात्मक कारवाई केली जातेय. स्वच्छतेचा एक वेगळा संदेश सचिन खोरे यांनी (Sachin Khore) आपल्या विवाहाच्या माध्यमातून समाजापुढे ठेवला आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा