दागिन्यांची ऑर्डर देत सोन्याचे बिस्कीट देण्याच्या अमिषाने फसविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

बेटींग किंगसह सराफा व्यावसायिक गजाआड, परिमंडळ १ च्या पथकाची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सराफा व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या टोळीचा फरासखाना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सोन्याचे बिस्किट देण्याचे अमिष दाखवत दागिने बनविण्यास लावून ते लंपास करत बनावट सोन्याचे बिस्कीट देऊन ही टोळी व्यावसायिकांना फसवत होती. याप्रकरणी पोलिसांनी कोल्हापूरातील बेटिंग किंगसह दोन सराफांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २८ लाख रुपये किंमतीचे ८०० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

प्रितम मळगट उर्फ ओसवाल(४३, इस्लामपुर) , नीतीन दलीचंद ओशवाल (४०, इस्लामपुर), विलास माणिक खामकर (३७, इस्लामपूर), महेश मोहन पाटील (२५, कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत दिनेश ओसवाल (वय 42, रा. कोंढवा) यांनी फरासखाना पोलीसांत फिर्याद दिली आहे.

दिनेश ओसवाल यांना फोन करून साडे तेरा लाख रुपयांचे दागिने तयार करण्याची ऑर्डर प्रितम नावाच्या व्यक्तीने फोन करून दिली. त्यानंतर याबदल्यात सोन्याचे बिस्कीट देण्याचे अमिष दाखवले. त्यांनी ठरल्याप्रमाणे ऑर्डर तयार करून ठेवली. त्याने दागिने सिंहगड रस्त्यावरील संतोष हॉलजवळ पत्नीला देण्यास सांगितले. परंतु दागिने देण्यासाठी आल्यानंतर त्यांना पत्नी दुकानात गेली आहे. कार चालकाकडे औषधांचा बॉक्स असल्याचे सांगून दागिन्यांचा बॉक्स देण्यास सांगितले. आणि कारचालकाला पिशवीतील एक बॉक्स फिर्यादींना देण्यास सांगितला. त्यांना सोन्याचे बिस्कीट मिळाले.

परंतु काही दिवसांनी ते तपासल्यावर बनावट असल्याचे ओसवाल यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा माग काढण्यास सुरूवात केली. यावेळी खडक परिसरातील  गौतम परमार यांचेसह मुंबईतील एका सराफाची फसवणूक अशाच प्रकारे केली गेली असल्याचे समोर आले. तांत्रिक तपासातात आरोपींची माहिती मिळाली. पथकाने प्रितम ओसवाल याला अटक केली.त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने इतर तिघांसोबत मिळून व्यापाऱ्यांना गंडा घातल्याचे सांगितले.

अशी करायचा फसवणूक

प्रीतम हा अत्यंत हुशार आणि चलाख आहे. त्याने जस्ट डायलवरून सराफा व्यावसायिकांचे फोन क्रमांक मिळविले. त्यानंतर त्यांना फोन करून सोन्याच्या दागिन्यांची ऑर्डर देत होता. त्यावेळी जास्त खडे व इतर वस्तू असणारे डिझाईन तो सांगत असे. जेणेकरून त्यामुळे सोने कमी परंतु, वजनात सोन्याचा भावाप्रमाणे पैसे मिळतात म्हणून व्यावसायिकही फायद्यापोटी या ऑर्डर घेतील. व्यावसायिकाला सोन्याचे बिस्कीट मिळत असल्याने तेही पटकन तयार होत असत. त्यानंतर एक कार बुक करून ऑर्डरचे दागिने कॅब चालकाकडे औषधांचा बॉक्स आहे असे सांगून द्यायला लावायचा. आणि तेथून पिशवीत सोन्याचे बिस्कीट द्यायचे. त्यानंतर कॅब चालकालाही न भेटता इतर मार्गाने ते दागिने घ्यायचे. विशेष म्हणजे त्याने गुन्ह्यात वापरलेले सिमकार्ड (मोबाईल क्रमांक) एका हॉटेलमधील नेपाळी वेटरशी ओळख वाढवून त्याचेकडून सिमकार्ड विकत घेतले होते.

बेटींग किंगही यात सामील

प्रीतम ओसवाल याचा पीढीजात सराफा व्यवसाय आहे. तर, महेश पाटील हा कोल्हापूरातील क्रिकेट सामन्यांवर बेटींग घेतो. नितीन ओसवाल हा प्रितम याचा चुलत भाऊ आहे. ओसवाल बंधुंचा पिडीजात सराफी व्यावसाय इस्लामपुर येथे होता. परंतु, काही वर्षांपुर्वी ते कोल्हापूरात आले. त्यानंतर तेथे व्यवसाय चालत नसल्याने तो बंद करून ते एक ते दीड वर्षांपुर्वी पुण्यात आले.

परिमंडळ एकचे उपायुक्त सुहास बावचे, वरिष्ठ निरीक्षक किशोर नावंदे, उपनिरीक्षक वाय. पी. सुर्यवंशी व विशेष पथकातील कर्मचारी सचिन इनामदार, बापू खुटवड, अमेय रसाळ, हर्षल शिंदे, महावीर वल्टे, नाना भांदुर्गे,  ज्ञानेश्वर पालवे, सुरेंद्र जगदाळे, महेश साळुंखे यांनी आरोपींना अटक केली.

Loading...
You might also like