Zoom, Google Meet, Microsoft Teams ला ‘टक्कर’ देण्यासाठी Facebook ‘सज्ज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाउनमुळे घरात अडकून पडलेल्या लोकांनी सर्वाधिक वापरलेल्या zoom App ला टक्कर देण्याचा प्रयत्न करण्यासाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्टने शिकस्त केली. गूगलच्या गूगलमीटचा पर्याय थेट गूगल ई-मेल अकाउंटशी जोडण्यात आला. मायक्रोसॉफ्ट टीम्सही अनेकांना व्हर्च्युअल मीटिंग करायला मदत करत होतं. यात आता Facebook नीही उडी घेतली असून, आपल्या ग्रुप व्हिडिओ चॅट मेसेंजर रूमच्या माध्यमातून जगभरात मोफत व्हिडिओ कॉल करायला परवानगी दिली आहे.

तुम्ही 50 माणसांशी मीटिंग करत असाल तर तुम्हाला वेळेचं कोणतंही बंधन फेसबूक घालणार नाही, अशी माहिती फेसबूकच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे घरात अडकलेल्या कोट्यवधी फेसबूकवासीयांची मोठी सोय फेसबुकचे मार्क झुकरबर्ग यांनी करून दिली आहे. घरी बसून ऑफिसचे सहकारी, नातेवाईक, मित्रमंडळींना या व्हर्च्युअल चॅट रूमशी जोडून घेता येणं शक्य आहे. व्हर्च्युअल चॅट रूमवर मित्र-मैत्रिणींच्या गप्पांचा फडही रंगू शकतो.