अडीच वर्षात सहा पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

सांगलीः ऑनलाईन पोलिसनामा
सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलीस ठाण्यामधील सहा पोलीससहा पोलिस निरीक्षकांची बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे  अडीच वर्षांमध्ये या सहा निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिसच्या कामामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्याने आणि गुन्हेगारीला वाचक बसवण्याचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या राजकीय हस्तक्षेपामुळे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तासगांव पोलीस ठाण्याला कायमस्वरूपी अधिकारी कधी मिळणार अशी चर्च्या सध्या पोलीस आणि नागरिकांमध्ये आहे.

तालुक्यातील गुन्ह्यांची संख्या वाढत असून दोन गटामध्ये वाद झाल्यास दोन्ही गटातील नेते फोन करुन विरोधी गटावर कारवाई करण्यास सांगतात. पोलीस अधिकाऱ्यांची त्यामुळे पंचायत होत आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना काम करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नक्षलवादी भागात काम केलेले बरे पण, तासगावमध्ये नको असे बदलून येणाऱ्या अधिकाऱ्याकडून ऐकण्यास मिळत आहे. बदली झालेल्या पोलीस निरिक्षाकापैकी एकाने फक्त एकच महिना या ठिकाणी काम केले. राजकीय हस्तक्षेपामुळे तासगाव पोलीस ठाण्यात कोणताच अधिकारी काम करण्यास तयार नाही. त्यामुळे तासगाव पोलीस ठाण्याला हक्काचा अधिकारी कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. अधिकारी मिळत नसल्याने तालुक्यात अवैध धंदे जोमात सुरु असून यातूनच वादाच्या घटना घडत आहेत.