कुपवाडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून

कुपवाड : पोलिसनामा ऑनलाईन
शहरातील सागर भिमराव माळी (वय:30,रा.कापसे प्लाॅट,कुपवाड) या तरूणाचा अनैतिक संबंधातून खून झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणातील संशयीत आरोपी रमेश सिद्राम सुर्यवंशी (वय:46,रा.कापसे प्लाॅट,कुपवाड) याच्यासह अन्य तीन साथीदारांनी सागर माळीचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह सांगलीतील कृष्णा नदीत फेकल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी संशयित सुर्यवंशीसह अन्य तीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.