धक्कादायक ! पाकिस्तानमध्ये 10 वर्षांच्या हिंदू मुलीचं अपहरण, जबरदस्तीनं लावलं लग्न

सिंध (पाकिस्तान ) : वृत्तसंस्था – पाकिस्तानमध्ये आणखी एका हिंदू मुलीचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. सिंधमधील इस्लाम कोट येथे राहणाऱ्या 10 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले आहे. सध्या या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पीडितेच्या कुटूंबाने न्यायाची मागणी केली आहे. सिंधमधून गेल्या दोन महिन्यांत हिंदू मुलीचे अपहरण करण्याची ही चौथी घटना आहे.

यापूर्वीही केले होते अपहरण
पाकिस्तानात शीख धर्मगुरुंच्या मुलीचं अपहरण करत जबरदस्ती धर्मांतर करुन मुस्लिम तरुणाशी लग्न लावण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. भगवान सिंह असं मुलीच्या वडिलांचं नाव असून मोहम्मद एहसान या तरुणाशी जबरदस्ती तिचं लग्न लावून देण्यात आलं. मुलीच्या कुटुंबीयांनी ट्विटरला व्हिडीओ अपलोड करत घटनेची माहिती दिली होती.

याआधी पाकिस्तानमधील सिंध आणि खायबर-पख्तूनवा प्रांतातून हिंदू आणि शीख तरुणींचे अपहरण करत जबरदस्ती धर्मांतर करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –