Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चा हाहाकार ! गेल्या 24 तासात 10576 नवे पॉझिटिव्ह तर 280 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी झालेला नाही. पण बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळत आहे. असे असले तरी गेल्या 24 तासात विक्रमी कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 10 हजार 576 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 5552 रुग्ण बरे झाले आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8 हजाराच्या आसपास होती. मात्र आज यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.


गेल्या 24 तासात 10576 नव्या कोरोना बाधित रुग्णांचं निदान झालं आहे. तर 280 जणांचा मृत्यू नोंदवण्यात आला आहे. दिवसभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. 5552 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 37 हजार 607 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 12556 वर गेला आहे.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून आतापर्यंत 1 लाख 87 हजार 769 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 36 हजार 980 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सरु आहे. अनलॉक नंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली आहे. त्यानंतर पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबईसह महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र तरीही कोरोना रुग्णांच्या संख्या वाढत आहे.