Coronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 11 नवे पॉझिटिव्ह

इंदापूर : इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय अंतर्गत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, मुलांचे वसतीगृृृृह इंदापूर येथील कोरोना कोविड केअर सेंटर अंतर्गत सोमवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी एकुण 27 कोरोना रूग्णांच्या संपर्कातील सशयीतांचे स्वॅब नमुणे तपासणीसाठी घेण्यात आले होते.सदर स्वॅबची तपासणी पूणे येथील प्रयोग शाळेत करण्यात आली असुन त्याचा रिपोर्ट दिनांक 1 सप्टेंबर 2020 रोजु सकाळी 8 वाजता प्राप्त झाला आहे. त्यामध्ये 11 जण पाॅझीटीव्ह आले आहेत.तर 16 जण निगेटीव्ह आले असुन तालुक्यात एकुण 33 जणांचा मृत्यु झाला आहे.तर एकुण 812 जण पाॅझीटीव्ह आढळुन आले असल्याची माहिती इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाॅ. सुहास शेळके यांनी दीली आहे.

मंगळवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी प्राप्त कोरोना तपासणी रिपोर्टनुसार 11जण कोरोना पाॅझीटीव्ह आले असुन त्यामध्ये इंदापूर शहरातील 38 वर्षीय महिला, 17 वर्षीय मुलगा, 22 वर्षीय युवक, 26 वर्षीय युवक, व 34 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. तर शेळगाव येथील 37 वर्षीय पुरूष, 34 वर्षीय पुरूष, 62 वर्षीय पुरूष, 31 वर्षीय पुरूष व 70 वर्षीय जेष्ठ नागरिकाचा समावेश आहे.तर वालचंदनगर येथील 21 वर्षीय युवतीचाही कोरोना पाॅझीटीव्ह मध्ये समावेश आहे. इंदापूर तालुक्यात पोलीस प्रशासनाकडून कोविड 19 च्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची व विना मास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई सुरू असल्याने नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालण करून कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन इंदापूर तालुका कार्यकारी दंडाधीकारी तथा तहसालदार सोनाली मेटकरी व इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाॅ.सुहास शेळके यांनी दीली आहे.