राज्यातील 11 पोलिस अधिकार्‍यांना भारत सरकारचे ‘केंद्रीय गृह मंत्री उत्कृष्ट तपास पदक’ जाहिर

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – दरवर्षी प्रमाणे यंदाही भारत सरकारच्या केंद्रीय गृह मंत्री उत्कृष्ट तपास पदकांची घोषणा झाली असून देशातील 101 पोलिस अधिकार्‍यांना ती जाहिर करण्यात आली आहेत. राज्यातील 11 पोलिस अधिकार्‍यांचा त्यामध्ये समावेश आहे.

भारत सरकारचे केंद्रीय गृह मंत्री उत्कृष्ट तपास पदक जाहिर झालेल्या पोलिस अधिकार्‍यांची नावे आणि त्यापुढील कंसात त्यांचा हुद्दा लिहीलेला आहे.

पोलिस उपायुक्‍त राज टिलक रोशन, पोलिस उपायुक्‍त दिपक पुंडलिक देवराज, पोलिस उपाधिक्षक सुरज पांडुरंग गुरव, सहाय्यक पोलिस आयुक्‍त रमेश नागनाथ चोपडे, पोलिस निरीक्षक दिनेश विठ्ठलराव आहेर, पोलिस निरीक्षक शशिराज गुंडोपंत पाटोळे, पोलिस निरीक्षक चिमाजी जगन्‍नाथ अढाव, पोलिस निरीक्षक सुरज जयवंत पाडावी, पोलिस निरीक्षक सुनिल किसन धनावडे, पोलिस निरीक्षक सचिन मुरारी कदम आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक धनंजय चित्‍तरंजन पोरे. पदक जाहिर झालेल्या सर्व पोलिस अधिकार्‍यांचे पोलीसनामा ऑनलाइनकडून अभिनंदन.

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी सुबोध जयस्वाल तर मुंबईच्या आयुक्‍तपदी संजय बर्वे