शिवसेना आमदाराच्या संपूर्ण कुटुंबालाच ‘कोरोना’ची बाधा, 14 जण पॉझिटिव्ह

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – विदर्भात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. अशातच बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबातील 12 सदस्य तसेच त्यांचा चालक व टंकलेखक असे एकूण 14 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे आमदार गायकवाड यांचे घर व संपर्क कार्यालय 11 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. तोपर्यंत कुणीही भेटू नये, असे आवाहन आमदार गायकवाड यांनी सोशल मीडियावरून केले आहे.

सध्या आमदार संजय गायकवाड हे विधिमंडळ अधिवेशनासाठी मुंबईत असून ते कोरोनापासून सुरक्षित आहेत. गायकवाड यांची पत्नी, सून व 12 दिवसांची नात, दोन पुतणे, वहिनी, दोन भाचे, भाच्यांच्या दोन मुली, एका भाच्याची पत्नी तसेच वाहन चालक व टंकलेखक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.