125 Rupee Coin | जारी करण्यात आलं 125 रुपयांचे ‘हे’ विशेष नाणे, जाणून घ्या ते कसे आणि कुठून खरेदी करायचे?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  125 Rupee Coin | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी 1 सप्टेंबरला 125 रुपयांचे (125 Rupee Coin) एक विशेष स्मृती नाणे (Commemorative Coin) जारी केले. हे नाणे त्यांनी इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस – इस्कॉन (International Society for Krishna Consciousness – ISKCON) चे संस्थापक श्री भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद (Srila Bhaktivedanta Swami Prabhupada) च्यांच्या 125व्या जयंती (125th birth anniversary) निमित्त जारी केले आहे.

कोण आहेत स्वामी प्रभुपाद?

स्वामी प्रभुपाद जगभरात पसरलेल्या इस्कॉन मंदिरच्या स्थापनेसाठी ओळखले जातात.
त्यांचा जन्म 1 सप्टेंबर 1896 ला कोलकतामध्ये झाला होता.
त्यांनी भगवान श्री कृष्णाचा संदेश देण्यासाठी इस्कॉनची स्थापना केली.
ISKON आणि आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ सुद्धा म्हटले जाते.
इस्कॉनने भगवत गीता आणि वैदिक साहित्याचे 89 भाषांमध्ये भाषांतर केले आहे.

जाणून घ्या कशाप्रकारचे आहे हे नाणे?

एखादी व्यक्ती विशेष किंवा घटना विशेषच्या सन्मानार्थ हे स्मृती नाणे जारी केले जाते.
हे विशेष प्रकारे डिझाईन केलेले असते. पहिले स्मृती नाणे 1964 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूयांच्या सन्मानार्थ जारी केले होते.

कुठे मिळेल 125 रुपयांचे हे नाणे?

तुम्हाला सुद्धा हे नाणे खरेदी करायचे असेल तर एसबीआयच्या टाकसाळीत त्याचे बुकिंग करू शकता.
रिझर्व्ह बँकेचे मुंबई आणि कोलकाता टाकसाळ ऑफिसच अशी स्मृती नाणी जारी करते.

याचे संचालन भारतीय सुरक्षा मुद्रण आणि चलन निर्मिती महामंडळ करते.
या नाण्यांसाठी महामंडळाच्या वेबसाइटवर अर्ज करावा लागेल, ज्यासाठी अगोदर रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही आरबीआयच्या साइटवर जाऊ शकता.

Web Title : 125 Rupee Coin | pm modi released 125 rupee coin check how and where to buy this details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pornographic Content | शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; कोर्टाने फसवणुकीच्या केसमध्ये दिल्ली पोलिसांकडे मागितला ATR

Sangli Crime | सांगलीत हत्याराची तस्करी करणार्‍या टोळीला अटक; 3 पिस्तूल, 6 जिवंत काडतुसे जप्त

Gold Price Today | सोनं मिळतंय 10000 रुपये ‘स्वस्त’, गुंतवणुकीची चांगली संधी; पहा 10 ग्रॅम सोन्याचे नवीन दर