गंडक नदीत होडी उलटल्याने 13 जण बुडाले, एक मृतदेह मिळाला तर 8 बेपत्ता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारच्या गोपाळगंज जिल्ह्यातील जादोपुरमधील मेहदिया गावाजवळ गंडक नदीत शनिवारी सकाळी सुमारे नऊ वाजताच्या सुमारास एक होडी उलटल्याने 13 लोक बुडाले. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. 4 जणांना स्थानिकांनी सुरक्षित बाहेर काढले. तर 7 लोक बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांमध्ये 5 महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे.

हे सर्वजण होडीने राजवाही दियारेकडे निघाले होते. कलेक्टर अरशद अजीज यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी मुजफ्फरपुरहून एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे.स्थानिकसुद्धा मदत करत आहेत.

दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. स्थानिक आमादारांनी सांगितले की होडी छोटी होती आणि त्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक बसले होते. मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे.