Coronavirus : पुण्यातील होम ‘क्वारंटाईन’ वाल्यांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी पोलिसांची 136 पथक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरातील “होम क्वारनटाईन” असणाऱ्या नागरिकांवर आता पोलीस नजर ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी तबल 136 पथक तयार केली आहेत. नागरिक स्वयंशिस्त पाळत आहे की नाही यासंदर्भात ही पथक माहिती घेणार आहेत. महानगरपालिकेने होम क्वारनटाईन असलेल्यांची यादी घेतली जाईल असे, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी सांगितले.

यावेळी पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत पोलिस आयुक्तालयात सुरक्षा बैठक पार पडली. यावेळी सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त मीतेश घट्टे उपस्थित होते.

जगभरासह राज्यात कोरोना आजाराने हाहाकार माजविला आहे. शासन उपाययोजना करत आहे. विशेषतः परदेशवरून आलेल्या नागरिकांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार मागील एक महिन्याभरात आंतरराष्ट्रीय प्रवास करणारयांची माहिती गोळा करून त्यांना वैद्यकीय चाचणीला दिले.
महानगरपालिकेकडून त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे.

मात्र, होम क्वारनटाईन असलेले काहीजण फिरत असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार संबंधितावर कारवाई करण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे. पुणे पोलिसांच्या १३६ टीमद्वारे होम क्वारनटाईन नागरिकांच्या घरी धडक दिली जाणार आहे. त्यानंतर संबंधिताची जनजागृती करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला जाणार असल्याचे डॉ. के. व्यंकटेशम यांनी सांगितले.

कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी दिवसरात्र काम करणारे डॉक्टर, परिचारिका, रुग्णवाहिका चालक यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी पोलिसांनी टाळ्या वाजून सन्मान केला.

आजपासून कर्फ्यु लागू
राज्य सरकाराच्या आदेशानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातंर्गत १४४ कलम लागू करण्यात आले आहे. पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुणे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या आदेशानुसार दोन्ही शहरात पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र जमाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
यात भाजीपाला विक्रेते, किराणा व्यवसायिक, हॉस्पिटल, मेडीकलचा समावेश आहे. मात्र, वस्तूंचा साठा करुन गैरफायदा घेणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.