Coronavirus : मुंबईत ‘कोरोना’चे 1372 नवीन रुग्ण तर 41 रुग्णांचा मृत्यू, ‘कोरोना’बाधितांची संख्या 24 हजारच्या उंबरठ्यावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाचे 1372 नवीन रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 23935 इतकी झाली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 41 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 841 झाली आहे. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.


बुधवारी राज्यात 65 कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला असून यामध्ये 41 रुग्ण हे मुंबईतील आहेत. तर पुण्यातील 13, नवी मुंबई 3, उल्हासनगर, पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि औरंगाबाद शहरातील प्रत्येकी 2 रुग्णांचा समावेश आहे. राज्यात बुधवारी 679 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्याभरात 10318 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात 26 हजार 581 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


आजपर्य़ंत पाठवण्यात आलेल्या 3 लाख 7 हजार 72 नमुन्यांपैकी 2 लाख 67 हजार 775 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 39 हजार 297 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 4 लाख 4 हजार 692 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 26 हजार 752 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.