Coronavirus : देशात नवीन परिसरात फोफावतोय ‘कोरोना’ व्हायरस, आता 140 ठिकाणं केली ‘हॉटस्पॉट’ म्हणून घोषित

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली असून आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात रुग्णांची संख्या ९१५२ वर पोहोचली आहे. यातील ७९८७ ऍक्टिव्ह प्रकरणे आहेत. आतापर्यंत ३०८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ८५७ रुग्ण बरे होऊन आपल्या घरी पोहोचले आहेत. यादरम्यान सरकारने देशामध्ये १४० भागांना आता कोरोना हॉटस्पॉट घोषित केले आहे, म्हणजे ते भाग जिथे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सध्या देशात ३०० असे जिल्हे आहेत, जिथे कोरोना संक्रमित रुग्ण मिळाले आहेत. यात महाराष्ट्रातील सर्वात जास्त ८ जिल्हे आहेत.

वाढत आहेत कोरोना हॉटस्पॉट क्षेत्र

आकडेवारीनुसार असे ६० जिल्हे आहेत जिथे १५ पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. या व्यतिरिक्त ८० जिल्ह्यांमधील कोरोना रूग्णांची संख्या १५ पेक्षा कमी आहे. अशा भागात सतत सील केले जात आहे, जिथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण समोर येत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतः रविवारी संकेत दिले आहेत कि दिल्लीच्या आणखी काही भागांना हॉटस्पॉट बनवून पूर्णपणे सील केले जाईल.

३०० पेक्षा जास्त मृत्यू

ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोरोनाचे ९१५२ रुग्ण आहेत, तर मृतांचा आकडा ३०० च्या वर गेला आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे प्रमाण सतत वाढत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २२१ नवीन समोर आली असून २२ जणांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यात संक्रमितांची संख्या वाढून १,९८२ झाली आहे.

दररोज १५ हजार पेक्षा जास्त टेस्ट

दरम्यान चांगली बातमी अशी आहे कि देशात केवळ २० टक्के रुग्णांना आयसीयूची आवश्यकता आहे, उर्वरित ८० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाचा किरकोळ प्रभाव आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत १ लाख ८६ हजार नमुने घेण्यात आले आहेत. दररोज १५ हजाराहून अधिक चाचण्या घेतल्या जात असून रुग्णालयांमध्ये आयसोलेशन बेड देखील वाढवण्यात येत आहेत.