पोलीस व्हॅन पलटी होऊन १६ कर्मचारी जखमी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – थर्टी फर्स्टनिमित्त बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलीस व्हॅनचे ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात १६ कर्मचारी जखमी झाले. कळवण तालुक्यातील आठंबे शिवारात ही घटना घडली. जखमींपैकी पाच जण गंभीर असून, त्यांच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थर्टी फर्स्टच्या बंदोबस्तासाठी व्हॅन क्र. (एमएच १५, एए ३०६७) नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयातून १६ पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन कळवण येथे जात होती. आठंबे शिवारात असताना अचानक ब्रेक फेल झाल्याने व्हॅन रस्त्यावर पलटी झाली. यात सर्व १६ कर्मचारी जखमी झाले. जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यातील अमरसिंग छोटूसिंग हजारी (वय ५६), चंद्रकांत शंकर माळी (वय ५३), निंबाजी सोमा जगताप (वय ५६), काशीनाथ एकनाथ पवार (वय ४३), किशोर वामन भांगरे (वय ४०) यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथील अपोलो रुग्णालयात हलविण्यात आले.

अपघाताची माहिती कळवण येथील सी. ए. गालिब मिर्झा यांनी भ्रमणध्वणीवरून अभोणा येथील पोलीस कर्मचारी बबनराव पाटोळे यांना कळवले. पाटोळे यांनी कळवण पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांना माहिती दिली. मांडवकर यांनी जखमींना कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल होत घटनेची माहिती घेतली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like