Coronavirus : पुण्यात 24 तासात ‘कोरोना’चे 163 नवे रूग्ण आढळले, 6 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं गेल्या दोन महिन्यांपासुन भारतात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात लक्षणीय आहे. मुंबई आणि पुण्यात तर कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान कोरोनाबाधित रूग्ण उपचारानंतर बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. पुण्यात दिवसभरात 163 नवे रूग्ण आढळले आहेत तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 109 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जवळपास 116 क्रिटिकल रूग्णांवर उपचार सुरूअसून त्यामध्ये 34 रूग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहे. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ही 2987 असून अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या ही 1332 आहे.