पिस्तूल घेऊन बनवत होता TikTok व्हिडीओ, डोक्यात गोळी लागल्याने झाला मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बरेलीमधील मुदिया भीकमपुर गावामध्ये 18 वर्षाच्या एका मुलाने टिकटॉक व्हिडीओ बनवताना स्वतःला गोळी घालून घेतली. घटना सोमवारी पाच वाजता घडली बारावीला असलेला केशव कुमार सोमवारी सायंकाळी आपल्या घरी परतला होता. त्याने आपल्या आईकडे परवाना असलेले पिस्तूल मागितले. आईने त्याला अनेकदा नकार दिला मात्र नंतर केशवने खूपच हट्ट केल्याने आईने त्याला ते पिस्तूल दिले असल्याचे सांगितले. आईने सांगितले की, मी स्वयंपाक घरात होते तेव्हा गोळीचा आवाज ऐकलं आणि पळत जाऊन पाहते तर माझा मुलगा केशव रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

महिलेने सांगितले की त्याच परिस्थिती त्याला रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. मृत मुलाचे वडील लष्करात आहेत त्यामुळं मुलगा आपल्या खांद्यावर बंदूक ठवून पोझ करत होता. तेव्हा अचानक गोळी चालली आणि त्याच्या डाव्या कानाखाली लागली असल्याची माहिती आईने दिली.

मुलाच्या वडिलांची पोस्टिंग रुड़कीमध्ये आहे. मुलाला नवीन नवीन व्हिडीओ बनवण्याचा आणि प्रोफाइल फोटो बदलण्याचा छंद होता. बनवलेले व्हिडीओज तो फेसबुक, इंस्टाग्राम टिकटॉक अशा प्रकारच्या सोशल मीडियावर टाकत असे. मुलाला एक बहीण देखील आहे. या घटनेनंतर त्याच्या आईने सांगितले की, तिला बंदुकीत गोळी आहे किंवा नाही याचा अजिबात देखील अंदाज नव्हता.

नवाबगंज येथील पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलाच्या कुटुंबीयांनी पोस्टमार्टम करण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले, की त्यांना अशी माहिती देण्यात आली होती की पिस्तुलाचा परवाना आई सावित्रीच्या नावावर आहे आणि तो बेडरूममध्ये असतो. पुढील गोष्टींचा तपास पोलीस सध्या करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/