पाकिस्तानकडून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जैश – ए – मोहम्मदाचा म्होरक्या मौलाना मसूद अझर याच्या भावासह तब्बल ४४ दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती ताजी असताना आता पाकिस्तानकडून तब्बल १८२ मदरसे ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच १०० दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पाकिस्तानने योग्य नियोजन करून करण्यात आली आहे अशी माहिती पाकिस्तान मंत्रालयाने दिली आहे.

मदरसांमध्ये धार्मिक कट्टरतेचं शिक्षण देण्यात येत असल्यानं त्यांच्याबाबतीत काय धोरण राबवायचं ही समस्या सध्या पाकिस्तानला भेडसावत आहे. पाकिस्तानमध्ये कट्टरतेकडे झुकलेल्या मुस्लीमांचं प्राबल्य असल्यामुळे अशा धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरसांच्या माध्यमातून लाखो गरीब मुलांना भरती करण्यात आल्याचा अंदाज आहे . जैश-ए-मोहम्मद सारख्या बंदी घालण्यात आलेल्या अनेक संघटनाही असे मदरसे चालवतात व दहशतवादाला पोषक असं शिक्षण या मुलांना देतात. इस्लामसाठी कल्याणकारी कार्ये करत आहोत असे वरवर दर्शवणाऱ्या जमात उल दावा सारख्या संघटना देशात ३०० मदरसे चालवत आहेत, असा अंदाज आहे.

नॅशनल अ‍ॅक्शन प्लॅनच्या अंमलबजावणीसाठी ४ मार्चला अंतर्गत सुरक्षा मंत्रालयात एक बैठक पार पडली. ज्यात पाकच्या राज्य सरकारमधील सगळ्या प्रतिनिधींची हजेरी होती. या बैठकीत कट्टरवादाचा आरोप असलेल्या संघटनांविरोधात वेगानं कारवाई करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं , त्यानुसार नियोजनबद्ध कारवाईला पाकिस्तानने सुरुवात केली आहे. मसूद अझरच्या भावासह ४४ जणांना ताब्यात घेतल्यानंतर आता १०० दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जागतिक स्तरावरून दबाव वाढत आहे. त्यामुळे देशातील १८२ मदरश्यांवर नियंत्रण व व्यवस्थापन करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने सांगितले. तसेच १२१ समाजकंटकांना प्रतिबंधित कारवाई म्हणून तुरुगांत टाकण्यात आल्याचेही मंत्रालयाने सांगितले.

महत्वाच्या बातम्या – 

RBI लवकरच जारी करणार २० रुपयाचे नाणे ; ‘हि’ असणार नाण्याची खासियत

धुळे : एसआरपी दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

केंद्र सरकारची मोठी घोषणा , ग्रॅच्युइटी करमुक्त !

‘त्या’ माजी खासदाराने शिर्डी संस्थानचे पद सोडावे

मोदींच्या ‘या’ घोषणेचे काय झाले ? – शरद पवार