काँग्रेस नगरसेवकासह 19 जुगाऱ्यांना अटक !

यवतमाळ : ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना लोकप्रतिनिधीच नियमांचे उल्लंघन करत असल्याचे पहायला मिळत आहे. यवतमाळ शहरात एका जीममध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून काँग्रेस (congress) च्या एका नगरसेवकासह 19 जणांना अटक केली. शहरातील आरटीओ ऑफिसच्या मागे असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई बुधवारी दुपारी सापळा रचून करण्यात आली. आरोपींविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

BIG NEWS

Pune : मंगलदास बांदल यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला, सुनावली 4 दिवसांची पोलीस कोठडी; जाणून घ्या कोर्टात काय झालं

काँग्रेस नगरसेवक सलीम शहा सुलेमान शहा (वय-50 रा. अलकबीरनगर), राजेंद्र भीमराव गुल्हाने (वय-48 रा. सुकळी), नरेंद्र रामनाथ यादव (वय-60 रा. बोदड), सलीम शहा गुलाब शहा (वय-40 रा. सुकळी), आरिफ अहेमद सिद्दीक अहेमद (वय-42), आसीफ रहीम खान शेख हबीब (वय-36 रा. अलकबीरनगर) मोहंमद जावेद शेख अहेमद (वय-50 रा. अलकबीरनगर), बबन चंपत भुसारे (रा. हादगाव), अमित वसंत नागभीडकर (वय-45 रा. तारपुरा), सुमीत कैलास पेठकर (वय-42 रा. पाटीपुरा), अब्दूल कय्युम खान (वय-44 रा. कुंभारपुरा), शेख इम्रान शेख जाफर (वय-41 रा. बाबनागर), गुलाब बाबूराव इंगळ (वय-55 रा. जयभारत चौक), उमेश लक्ष्मण गुरखे (वय-35 रा. उमरसरा), अनिल शिवचंद चव्हाण (वय-50 रा. आसोला खुर्द), झायेद शहाद तगाले (वय-35 रा. गांधी चौक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी सापळा रचून आरोपींना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी या कारवाईत घटनास्थळावरुन दोन लाख 44 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण भाकडे, महेश मंगुळकर, अंकुश फेंडर, मिलिंद दरेकर, अमित मस्के यांच्या पथकाने केली.

Also Read this : 

निरोगी आणि तंदुरुस्त शरीरासाठी उतम व्यायाम पायऱ्या चढणे

मनसेनेचा CM ठाकरेंवर जोरदार निशाणा, म्हणाले – ‘… तर सरकार वाचवण्यासाठी ‘होम’मध्येच असणाऱ्यांचे जोरात हवन चालू आहे’

हिवाळ्यात श्वसनाच्या आजारांना दूर पळवा

Immune Weakening Foods : तुम्ही तुमची इम्युनिटी कमजोर तर करत नाही ना? जाणून घ्या असे 4 फूड्स ज्यामुळे आजारी पडू शकता

#YogaDay2019 : मधुमेहाच्या रूग्णांसाठी वरदान आहे ‘मुद्रासन’