2 सराईत शस्त्रासह हिंजवडी पोलिसांच्या जाळ्यात

हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाइन – गंभीर गुन्हा करण्यासाठी निघालेल्या दोन सराईत गुन्हेगारांना हिंजवडी पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. त्यांच्याकडून धारदार तलवार आणि कोयता जप्त करण्यात आला आहे. हिंजवडी पोलिसांनी ही कारवाई सुसगांवाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सुसखिंडीजवळ मंगळवारी रात्री एकच्या सुमारास केली.

राहुल विठ्ठल शहाणे (वय-२२ रा. शिरवण ता. अक्कलकोट, जि. सोलापूर), धर्मराज शिवलिंग येळेकर (वय-२२ रा. वेताळचौक, अक्कलकोट, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई पांढरे यांनी फिर्याद दिली आहे.

मंगळवारी रात्री हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी हद्दीमध्ये गस्त घालत होते. दरम्यान, नंबर प्लेट नसलेली दुचाकी सुसरोडच्या दिशेने भरधाव वेगात जाताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून सुसखिंडीजवळ गाडी आडवून दोघांकडे चौकशी केली. तसेच त्यांची अंगझडती घेतली असता एक तलवार आणि एक कोयता आढळून आला. आरोपी चोरी करण्याच्या उद्देशाने किंवा दुसरा कोणतरी गुन्हा करण्यासाठी जात असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते, हिंडवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक गुन्हे अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली तपसा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अररुद्ध गिझे, एम.डी. वरुडे यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –