गोळीबाराचा प्रयत्न करणारे दोन गुन्हेगार गजाआड

ठाणे :  पोलीसनामा ऑनलाईन

माथाडी कामगार संघटनेचा उपाध्यक्ष जगदीश कुडेकर (३१) याच्यावर ८ दिवसांपूर्वी बदलापूर येथे गोळीबाराचा प्रयत्न झाला होता. हल्लाखोरांचे पिस्तुल न चालल्याने कुडेकर बचावले होते. त्या गोळीबार प्रयत्नप्रकरणी २ जणांना उल्हासनगर परिमंडळ -४ च्या जबरी चोरी प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्रही ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस उपआयुक्त प्रमोद शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’203862a1-cdde-11e8-9dff-c1f529d76c64′]

दत्ता रामदास कासोडे उर्फ शेलार (२६)  विवेक नायडू (२२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. ८ दिवसापूर्वी बदलापूर पश्चिम येथील रेल्वे स्टेशनजवळील सानेवाडी परिसरातील शामराव विठ्ठल को.आप. बँकेसमोर माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष जगदीश कुडेकर यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाला होता. दरम्यान, अंबरनाथ एमआयडीसी परिसरात मोरीवली येथे २ व्यक्ती मोटरसायकलवरून शस्त्रानिशी काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची गुप्त माहिती परिमंडळ -४ चे पो.उपायुकत प्रमोद शेवाळे यांच्या जबरी चोरी प्रतिबंधक पथकाचे पो.उप.नि.येवले यांना मिळाली होती.

एअर इंडियाचे विमान सरंक्षक भिंतीला धडकले

या माहितीवरून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह संबंधित ठिकाणी सायंकाळच्या सुमारास सापळा रचला. येथे बजाज मोटरसायकलवरून आलेल्या २ जणांना पोलिसांनी अटक केली. त्या दोघांची झडती घेतली असता आरोपी विवेककडे १ पिस्तुल, १ जिवंत काडतूस, १ मोबाईल फोन, तर आरोपी  दत्ताकडे १ सुरा, १ मोबाईल फोन व मोटरसायकल असा ८८ हजार १५० रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून विवेक याच्यावर बदलापूर पूर्व व पश्चिम पोलीस ठाण्यात २ तर  दत्ता याच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे ३ गुन्हे दाखल आहेत. त्यांनीच गोळीबाराचा प्रयत्न केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

[amazon_link asins=’B01M0JSAFU,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’88cfbeb3-cdde-11e8-acd0-7350e8bb4720′]