जमिनीच्या वादातून कुटूंबास मारहाण, दोन महिला जखमी

इंदापूर : पोलीसनामा आॅनलाईन

जमिनीच्या वादातुन इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी ता.इंदापूर येथील कुटुंबास मारहाण झाल्याची घटना घडली असून यामध्ये दोन महिला जखमी झाल्या आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ad9215bb-c195-11e8-9b86-f78b3d5b15ac’]

इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये सल्लाउद्दिन यासूब शेख रा. लुमेवाडी ता. इंदापूर. यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, आमचे मालकीची लुमेवाडी येथे जमीन गट नं.३६४/२ सहा एकर क्षेत्र असून आमचे शेजारी मुस्तफा पापा सय्यद यांची जमीन गट नं.३६४/१ मध्ये ६ एकर जमीन आहे. आमच्यामध्ये जमिनीच्या बांधावरुन यापूर्वी वारंवार भांडने झाली आहेत. मंगळवार २५ सप्टेंबर रोजी सकाळी मी घरी नसताना आमचे घरी सादीक यासूब शेख व शरिफ सिद्धिक शेख हे घरी येऊन त्यांनी माझी पत्नी रुक्साना व मुलगी आशया अफताब पठाण, मुलगा जाकीर सल्लाउद्दिन शेख यांना शिवीगाळ करुन तुम्हाला आता जिवंत ठेवत नाही. असे म्हणून दोघांनी हातातील काठी व लोखंडी गजाने मारहान केली.
[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’958051f2-c196-11e8-a157-379a96afc916′]

सांगलीतील वाळवा तालुक्यात ७ मुलींचे लैंगिक शोषण

घरातून मोठमोठयाने आवाज आल्याने मी ही भांडणे सोडवणूक करण्यासाठी तेथे पोहोचलो असता. मझ्यासह मुलालाही त्यांनी मारहाण केली. यामध्ये माझी मुलगी आयशा हिच्या कपाळावर गंभिर मार लागल्याने मुलीसह माझी पत्नी यांना इंदापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घडलेल्या घटनेबाबात सल्लाउद्दिन यासूब शेख यांनी इंदापूर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास इंदापूर पोलिस करीत आहेत.

[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’958051f2-c196-11e8-a157-379a96afc916′]