home page top 1

मुंबईतील ‘हे’ 20 रेल्वे ओव्हर ब्रीज ‘डेंजर’, विसर्जन मिरवणुकीदरम्यान नाचण्यास बंदी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बृहन्मुंबई महानगरपालिकाने वाहतूक पोलिसांच्या मदतीने गणेश विसर्जनाच्या शेवट्या दिवशी गणेश मंडळांना काही विशेष सूचना दिल्या आहेत. सार्वजनिक नोटीस पाठवून गणेश मंडळांना आवाहन केले आहे की काही रेल्वे पूला (ओवर ब्रिज) वर गर्दीमुळे एखादी दुर्घटना घडू शकते. महानगरपालिकेने 20 पुलांची माहिती दिली आहे. यात सेंट्रल लाइनचे 4 आणि वेस्टर्न लाइनचे 16 असे पूल आहेत. महानगर पालिकेने यासंबंधित यादी जाहीर केले आहे.
सेंट्रल रेल्वे –

1. घाटकोपर रेल्वे ओवर ब्रिज
2. करी रोड रेल्वे ओवर ब्रिज
3. आर्थर रोड रेल्वे ओवर ब्रिज
4. भायखळा रेल्वे ओवर ब्रिज

वेस्टर्न रेल्वे –
1. मरीन लाइन रेल्वे ओवर ब्रिज
2. ग्रांट रोड फेरेर रेल्वे ओवर ब्रिज
3. संधुर्स्ट रोड ओवर ब्रिज
4. फ्रेंच रेल्वे ओवर ब्रिज
5. कॅनेडी रेल्वे ओवर ब्रिज
6. फाकलँड रेल्वे ओवर ब्रिज
7. बेलाइस रेल्वे ओवर ब्रिज
8. महालक्ष्मी रेल्वे ओवर ब्रिज
9. दादर टिळक रेल्वे ओवर ब्रिज
10. वीर सावरकर रेल्वे ओवर ब्रिज
11. सुधीर फडके रेल्वे ओवर ब्रिज
12. दहिसर रेल्वे ओवर ब्रिज
13. मिलन रेल्वे ओवर ब्रिज
14. विले पार्ले रेल्वे ओवर ब्रिज
15. गोखले रोड ओवर ब्रिज
16. प्रभादेवी रेल्वे ओवर ब्रिज

याशिवाय BMC ने भक्तांना आवाहन केले आहे की, त्यांनी चिंचपोकळी रेल्वे ओवर ब्रिज आणि करी रोड रेल्वे ओवर ब्रिजवरुन चालताना सावधगिरी बाळगावी. तसेच वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.
महानगरपालिकेच्या भाविकांना सूचना –

1. विसर्जनाला पूलांवरुन जाताना सावध रहा, अशा पूलांवर 16 टन पेक्षा अधिक वजन देऊ नका.
2. पुलांवर साऊंड सिस्टिमचा वापर करुन डान्स करु नका.
3. पूलांवर थांबून राहू नका

अनंत चतुर्थी निमित्त भाविकांची मुंबईत मोठी गर्दी असेल. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालिका सतर्क आहे, आणि त्यासाठीचे आयोजन पालिकेकडून करण्यात येत आहे.

आरोग्यनामा ऑनलाइन –

Loading...
You might also like