‘डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन’ योजनेतून पूर्व हवेलीतील 7 गावांना 211 कोटीचा निधी

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – शहरीकरणाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गावांना विकासाची गती कायम राखता यावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संकल्पनेतून राष्ट्रीय ग्रामीण अभियानांतर्गत डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन योजनेचा प्रारंभ सप्टेंबर 2016 मध्ये झाला. यामध्ये पुणे जिल्ह्यातील पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबा, सोरतापवाडी, शिंदवणे, तरडे आणि वळती या गावांचा समावेश झाला असून या गावांना पहिल्या टप्प्यात 211 कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

गावाच्या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी त्यासाठी तेथील प्रश्न, त्यासाठी दूरदृष्टीचे प्रकल्प तयार करुन परिपूर्ण शहर बनवण्यासाठी करावयाच्या सर्व उपाययोजना एकाच छताखाली राबवण्यासाठी ही संकल्पना आहे. गावात पिण्याच्या पाण्याची सोय, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, शिक्षण सुविधा, कृषी सेवा योजना याचा यामध्ये समावेश आहे.

तत्कालीन पालकमंत्री गिरीष बापट यांनी हा निधी उपलब्ध करुन दिला आहे. यातील लोणी काळभोर (10कोटी 56लाख), कुंजीरवाडी (4कोटी 58लाख), आळंदी म्हातोबा (1कोटी 90लाख), सोरतापवाडी (2कोटी 90लाख), शिंदवणे (2कोटी 96लाख), तरडे(1कोटी 1लाख) व वळती(1कोटी) असा निधी उपलब्ध झाला आहे. या योजनेचा प्रारंभ नगरविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

आरोग्यनामा ऑनलाइन –