पुणे जिल्ह्यात ‘एवढी’ असंवेदनशील आणि ‘असुरक्षित’ मतदान केंद्रं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यात एकूण २१४ संवेदनशील तर ४ असुरक्षित मतदान केंद्रं असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तर यात पुणे लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक ९१ असंवेदनशील मतदान केंद्रं आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदान सुरक्षित व शांततेत पार पडावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून संवेदनशील आणि असुरक्षित मतदान केंद्रांची यादी तयार केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील ९९ मतदान केंद्रं संवेदनशील आहेत. यात कॅन्टोनमेंट बोर्ड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक २१ मतदान केंद्र, तर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील१६, कसबा पेठ आणि शिवाजीनगर मधील प्रत्येकी १४ आणि कोथरुड मधील ९ मतदान केंद्रांचा समावेश आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील एकूण ६३ मतदान केंद्र तर इंदापूर मतदारसंघातील सर्वाधिक १९ मतदान केंद्र संवेदनशिल आहेत. खडकवासला १३, बारामती व दौंडमध्ये प्रत्येकी ९, भोरमध्ये ८ तर पुरंदरमध्ये ५ संवेदनशील मतदान केंद्र संवेदनशील आहेत. असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

निवडणूकांदरम्यान कायदा सुव्यवस्था राखली जावी, निवडणूका शांततापुर्ण वातावरणात पार पडाव्यात यासाठी या मतदान केंद्रांवर जिल्हा प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जाते. संवेदनशील व असुरक्षित केंद्रांवर सुक्ष्म निरीक्षक व केंद्रीय निवडणूक आयोगाने पाठवविलेल्या प्रशिक्षित अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्याप्रमाणे मतदान केंद्रांवर पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येतो.

दरम्यान जिल्हा प्रशासनाची तयारी पुर्ण झाली असून संवेदनशील मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडावे यासाठी खबरदारी घेतली गेली आहे. जिल्ह्यातील १ हजार मतदान केंद्रांचं वेबकास्टींग होणार आहे. त्यासोबतच मतदान केंद्रांवर दुबार मतदान होणारनाही याची खबरदारी घेतली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.