सीसीटीव्हीसाठी 22 मंडळांनी घेतला पुढाकार : अधीक्षक शर्मा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन 

शहर सुरक्षिततेसाठी पोलीस दलाने केलेल्या आवाहनाला गणेशोत्सव मंडळांनी उत्स्फुर्त पुढाकार घेतला आहे. सांगली-मिरजेतील 22 मंडळांनी “सीसीटीव्ही’साठी घेतला आहे. त्यापैकी काहींनी धनादेश सुपुर्त केले असून मिरजेतील दहा मंडळे शनिवारी सीसीटीव्ही देणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे उपस्थित होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6e59a0e1-bcda-11e8-b58d-61071e92950b’]
उत्सवात मोठ्या आवाजाच्या ध्वनि यंत्रणेला फाटा देवून समाजिक कार्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलिस दलातर्फे करण्यात आला. गतवर्षी या आवाहनाला प्रतिसाद अनेक मंडळांनी पुढाकार घेतला. त्यातून दोन बंधारे बांधण्यात आले. यंदाच्या वर्षी पोलिस दलाने शहर सुरक्षिततेसाठी आवाहन केले. त्यालाही सांगली-मिरजेसह जिल्ह्यातील मंडळांनी उत्स्फुर्त सहभाग घेण्यास सुरूवात केली आहे.
अधीक्षक शर्मा म्हणाले,”शहरात सध्यस्थितीत 80 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. त्यामाध्यमातून अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. परंतू अंतर्गत रस्तांसह वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्हींची गरज आहे. त्यासाठी पोलिस दलाला आणखी 120 सीसीटीव्हींची गरज आहे. मंडळांनी उत्स्फुर्तपणे पुढाकार घेतला आहे.”

अनंत चतुर्दशीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

अधीक्षक सुहैल शर्मा म्हणाले,”अनंत चतुर्दशीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून जिल्ह्यातील पोलिसांसह 700 होमगार्ड, एसआरपीएफ, आरसीपी यांच्यासह 370 विशेष पोलिस अधिकाऱ्यांचा बंदोबस्त असेल. ”

[amazon_link asins=’B0748NPV86,B011IRCV8C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0deceda6-bcdf-11e8-8078-1d111f91f91d’]