Sangli : लग्नाचे आश्वासन देऊन फसवणूक, 22 वर्षीय महिलेची आत्महत्या; प्रियकरावर FIR

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – प्रियकराने दिलेले लग्नाचे आश्वासन न पाळल्याने एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना शामरावनगर मध्ये 10 मे रोजी घडली आहे. याप्रकरणी महिलेच्या प्रियकराविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरोजा गजानन आवळे (वय-22 रा. सहरा कॉलनी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

सरोजा आवळे यांच्या आई शेवंती हणमंत तगडे (रा. गुलाब कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादेवरुन पोलिसांनी सागर हणमंत खाडे (रा. शामरावनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी सागर खाडे याला मदत करणाऱ्या चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सागरला मदत करणारे सुनील पुजारी आणि पंडित ऐवळे यांना ताब्यात घेतले आहे. तर सागर खाडे, सुरेश हणमंत जगदाळे, उदय घाडगे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मयत सरोजा यांच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सरोजा हिचे पूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मात्र पती बरोबर पटत नसल्यामुळे ती स्वतंत्र रहात होती. त्यानंतर तिचे सागर याच्या बरोबर प्रेमसंबंध जुळले होते. ते एकत्र रहात होते. सागरने आपण लवकरच लग्न करु असे आश्वासन सरोजला दिले होते.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून सागर दारु पिऊन सरोजला मारहाण करत होता. सागर याचा मामा सुरेश जगदाळे व मित्र ऐवळे, घाडगे यांनी सरोजला सागर सोबत लग्न करायचे नाही, असे सांगत दमदाटी करुन शिवीगाळ केली. त्यावर मी त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. परंतु सागरचा मामा जगदाळे आणि माझ्या नातेवाईकांनी मध्यस्थी केली. सागरने सरोजसोबत लग्न करण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर 10 मे रोजी सरोजने गळफास घेऊन आत्महत्या केली. या सर्व प्रकाराला सागर त्याचा मामा आणि त्याचे मित्र जबाबदार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.