ब्रेकिंग – राजस्थान : ‘मेज’ नदीमध्ये प्रवासी बस बुडाली, 24 जणांचा मृत्यू

राजस्थान : राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील लाखेरी भागात एक बस मेज नदीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रसंगी बचाव कार्य सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोटा जिल्ह्यातून एक बस सवाईमाधोपूरकडे जात होती. बुंदीतील लाखेरी येथील मेज नदीत एक खासगी बस कोसळली. बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी होते. प्रसंगी स्थानिकांसह प्रशासनाने बचावकार्य सुरू केले. घटनास्थळी हजारो लोक जमले आहेत. अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी अंतर सिंह आणि एसपी शिवराज सिंह घटनास्थळी रवाना झाले. माहितीनुसार, काही लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, २४ लोकांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

दरम्यान, अजूनही काही लोक अडकल्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंबंधित कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

You might also like