विधानसभेत पाटलांची आमदारकी फॉर्मात ! राष्ट्रवादीचे 10, सेनेचे 4 तर काँग्रेस अन् भाजपचे प्रत्येकी 3 ‘पाटील’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 13 व्या विधानसभेत पाटील आडनाव असणारे तब्बल 23 आमदार होते. यानंतर आता 14 व्या विधानसभेत पाटील आडनावाचे तब्बल 24 आमदार असणार आहेत. पाटील आडनावात अनन्यसाधारण महत्त्व आहे. राज्यातील राजकारणात तसेच इतर क्षेत्रासह ग्रामीण भागात पाटील या आडनावाचा दबदबा आहे. आपले नाव वजनदार व्हावे यासाठीही अनेकजण मूळ आडनावापुढे पाटील लावतात. यावेळी म्हणजे 14 व्या विधानसभेत 24 आमदार असे असणार आहेत ज्यांचे आडनाव पाटील आहे.

यावेळच्या विधानसभेत जे पाटील निवडून आले त्यातील 9 पाटील हे गेल्यावेळी आमदार होते. निवडून येणाऱ्यांमध्ये सर्वाधिक पाटील हे राष्ट्रवादीचे आहे. राष्ट्रवादीचे 10, शिवसेनेचे 4, काँग्रेस आणि भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले प्रत्येकी 3 जण आहेत. याशिवाय मनसे आणि बहुजन विकास आघाडीचा प्रत्येकी एक जण पाटील आहे. तर दोन पाटील हे अपक्षही आहेत.

निवडून आलेल्या पाटील नावाच्या आमदारांमध्ये राजेश पाटील (बोईसर), राजू पाटील (कल्याण, ग्रामीण), रविंद्र पाटील (पेण), दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), चंद्रकांत पाटील (कोथरूड), राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी), शहाजी पाटील (सांगोला), मकरंद पाटील (वाई), बाळासाहेब पाटील (कराड), राजेश पाटील (चंदगड), ऋतुराज पाटील (कोल्हापूर, दक्षिण), पी.एन. पाटील (करवीर), रजेंद्र पाटील (शिरोळ), जयंत पाटील (इस्लामपूर), सुमनताई पाटील (तासगाव, कवठे महाकाळ), राहुल पाटील (परभणी), बाबासाहेब पाटील (अहमदपूर), कैलास पाटील (उस्मानाबाद), कुणाल पाटील (धुळे), गुलाबराव पाटील (जळगाव, ग्रामीण), अनिल पाटील (अमळनेर), किशोर पाटील (पाचोरा), चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर), चिमणराव पाटील (एरंडोल) यांचा समावेश आहे.

Visit : policenama.com