‘आकाश’च्या सुटकेसाठी 25 लाखांची ‘डिमांड’, मामाकडे जातो असं सांगून गेला अन् परतलाच नाही
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मूळचे नायगाव येथे राहणारे आणि सध्या सहकारनगर येथे वास्तव्याला असलेले भानुदास खुटवड यांचा मुलगा मी मामाच्या गावाला चाललोय असे सांगून निघाला होता. मात्र कुटुंबीयांचा त्याच्याशी पुन्हा संपर्क झालाच नाही. शेवटी कुटुंबीयांनी धनकवडी पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार दाखल केली तेथील पोलिसांनी ही तक्रार सहकारनगर पोलीस चौकीकडे पाठवली.
2 जानेवारी 2019 ला त्यांचा मुलगा घरातून निघाला होता त्यानंतर तीन चार दिवसानी खुटवड यांना एका हिंदीत बोलणाऱ्या माणसाचा फोन आला. त्याने खुटवड यांच्याकडे 25 लाखांची मागणी केली. यावेळी मुलाच्या काळजीने त्यांनी मी थोडे थोडे करून पैसे देतो परंतु मला मुलाशी बोलू द्या अशी मागणी केली. पुढील सलग दोन – तीन दिवस हे फोन येताच राहिले विशेष म्हणजे हे सर्व फोन सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये रेकॉर्ड देखील झाले होते.
खुटवड यांनी सांगितले की, मी एक रिक्षा चालक आहे माझा मुलगा आकाश हा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. ऐपत नसताना ही 25 लाख रुपये देतो असे त्यांना सांगितले आणि मुलाशी बोलण्याची इच्छा वर्तवली मात्र त्यांनी माझे ऐकले नाही अशी माहिती खुटवड यांनी दिली. तुम्ही पैसे बँक अकाउंटमध्ये जमा करा मग तुमच्या मुलाला दादरला सोडतो असे फोनवरून सांगण्यात आले होते.
नंतर फोन येणे देखील बंद झाले आता आकाशला जाऊन जवळ जवळ वर्ष होईल मात्र अजूनही त्याचे वडील आपल्या मुलाच्या प्रतीक्षेत आहेत. पोलिसांकडे याबाबत विचारणा केली असता तुमच्या मुलाच्या मनात आले की तो घरी येईल असे उत्तर त्यांना पोलिसांकडून दिले जाते. आकाश बद्दल सांगताना त्याच्या वडिलांच्या डोळे पाणवल्याचे दिसून आले.
फेसबुक पेज ला लाईक करा 👉: https://www.facebook.com/policenama/
- पायी वेगाने चालण्याचे ‘हे’ आहेत तब्बल ३४ फायदे, वाचून व्हाल थक्क !
युष्य लाभण्यासाठी नियमित खा ‘हे’ फळ ! जाणून घ्या ६ फायदे - मडक्यातील पाण्याचे ९ फायदे आणि फ्रिजच्या पाण्याचे ५ तोटे जाणून घ्या
- ‘सुपरफूड अॅवोकॅडो’! खाताना, खरेदी करताना, साठवताना ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा
- लठ्ठपणाच्या दुष्परिणामांचे ‘हे’ आहेत २ मुख्य प्रकार, जाणून घ्या
- तुम्ही लठ्ठ आहात का ? ‘या’ २ पद्धतीने ओळखा, नेहमी लक्षात ठेवा या ४ गोष्टी
- काविळ, दम्यावर कांदा गुणकारी ! ‘हे’ आहेत 7 आरोग्यदायी फायदे