Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात आणखी 279 पोलिस ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, आतापर्यंत 70 जणांचा बळी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यातच राज्याच्या पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोरोना संक्रमित होत असल्याने प्रशासनाची अधिकच चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 279 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

राज्यात कोरोनाचा धोका वाढत असताना सामान्य नागरिकांबरोबरच कोरोना माहामारीच्या संकट काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना कोरोनाचा संसर्ग अधिकच होत चालला आहे. राज्यातील कोरोना बाधित पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 5 हजार 454 वर पोहचली आहे. सध्या 1 हजार 78 पोलिसांवर उपचार सुरु असून, आतापर्यंत कोरोनामुळे 70 पोलिसांचा राज्यात मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या संकट काळात पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. नागरिकांनी घरात सुरक्षित रहावे म्हणून हे सर्व कोरोना योद्धे जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, आता या कोरोना योद्ध्यांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतल्याचे पहायला मिळत आहे.