खबरी म्हणून चिडविण्यावरुन गुन्हेगाराच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका खुनाची खबर पोलिसांना दिली म्हणून दुसऱ्या टोळीतील गुन्हेगार एकाला खबरी म्हणून चिडवित होते. त्यावरुन दोन टोळ्यांमध्ये अनेकदा भांडणेही झाली. खबरी म्हणून हाक मारुन चिडविल्याच्या रागातून लष्करमधील कुरेशी मशिदीजवळ एकावर पाच जणांनी मिळून पालघनने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला होता.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b329938c-bd5b-11e8-b3b0-633400ccbd5d’]

या प्रकरणी लष्कर पोलिसांनी काल तिघांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ही बाब पुढे आली आहे. लष्कर भागातील कुरेशी मशिदीजवळ पाच जणांनी पालघनने वार करुन केलेल्या हल्ल्यात परवेज पटवेकर (वय २७, रा. गुरुवार पेठ) हा जखमी झाला होता. ही घटना लष्कर भागातील कुरेशी मशीदीजवळ बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणात एलियास इसाक बागवान, गौस ऊर्फ  माया दस्तगीर शेख (रा. कोंढवा) आणि शाहबाज ऊर्फ चिन्या सादिक बागवान यांना लष्कर पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, यातील जखमी आणि आरोपी हे दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. परवेज पटवेकर व त्याच्या साथीदारांनी एकाचा खुन केला होता. त्याची खबर माया शेख याने पोलिसांनी दिली होती. असा दुसऱ्या टोळीचा संशय होता. त्यावरुन माया ही टोळी खबरी म्हणून चिडवत असे. एलियास बागवान हाही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

चोरीचा खोटा आरोप सहन न झाल्याने महिलेची आत्महत्या

दोन दिवसांपूर्वी कोंढवा येथे एलियास बागवान आणि गौस दस्तगिरी यांच्याबरोबर परवेज यांच्यात एकमेकाकडे पहाण्यावरुन भांडणे झाली होती. त्यानंतर बुधवारी सायंकाळी परवेज हा त्याचा मित्र फैजल अन्वर शेख यांच्याबरोबर ताबुत पाहण्यासाठी कुरेशी मशीदीजवळील एका दुकानाबाहेर उभे होते. त्यावेळी इलियास आपल्या मित्रांना घेऊन तेथे आला. त्यांनी पालघनने परवेज याच्या डोक्यात, हातावर, पायावर सपासप वार केले. त्यानंतर दोघे पळून गेले. नागरिकांनी परवेजला ससून रुग्णालयात दाखल केले होते. हे तिघेही सोलापूरला पळून जाण्याच्या तयारीत होते. याची माहिती मिळताच पोलीस हवालदार शैलेश जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिघांना २४ तासाच्या आत अटक केली.

सामान्यांना सतावणाऱ्या प्रश्नांवर सरकार बोलत नाही : सयाजी शिंदे

ही कारवाई पोलीस उपायुक्त बच्चनसिंग, सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले, पोलीस निरीक्षक दिंगबर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक  प्रसाद गज्जेवार, राजेंद्र सोनवणे, हवालदार शैलेश जगताप, आबा धावडे, गणेश कोळेकर, मुसेफ पठाण यांनी केली.

[amazon_link asins=’B07811BTY8,B07DRJ4HD6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’37c3f517-bd5c-11e8-8d3e-dba46719a737′]