नीरा येथे शुक्रवारपासून 3 दिवस जनता कर्फ्यु

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन –  नीरा (ता.पुरंदर) गावच्या सीमेजवळच असलेल्या सातारा जिल्ह्यातील पिंपरे बुद्रुक ( ता.खंडाळा ) येथे एक जण व पाडेगांंव फार्म (ता.फलटण) येथे दोन जण कोरोणा बाधीत रूग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शुक्रवार (दि.१० ) ते रविवार (दि.१२) असे तीन दिवस बाजारपेठ बंद ठेऊन नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यू पाळावा असे आवाहन नीरा ग्रामपंचायतीचे सदस्य अनिल चव्हाण यांनी केले आहे.

या तीन दिवसांत हाँस्पिटल व औषध दुकाने या अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठेतील इतर सर्व दुकाने बंद राहणार असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता स्वतः ची काळजी घ्यावी असे आवाहनही अनिल चव्हाण यांनी केले आहे.