3 माजी महापौरांसह 20 नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द

दिल्‍ली: पोलीसनामा ऑनलाईन

विहित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने कोल्हापूरच्या 20 नगरसेवकांच नगरसेवक पद रद्द झाले आहे. त्यामध्ये 3 माजी महापौरांचा समावेश असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देल्याने कोल्हापूरमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’566e05d5-a6c1-11e8-aebf-c50c25852c21′]

कोल्हापूरमधील नगरसेवकांना विहित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सांगण्यात आले होते. मात्र, तब्बल 20 नगरसेवकांनी विहित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूरमधील तब्बल 20 नगरसेवकांच नगरसेवक पद रद्द केले आहे. 20 नगरसेवकांच पद रद्द झाल्यामुळे संबंधित प्रभागात फेरनिवडणुक होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अश्‍विनी रामाणे, स्वाती येवलुजे, हसिना फरास या 3 माजी महापौरांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12 आणि काँग्रेसच्या 8 अशा एकुण 20 नगरसेवकांचे पद रद्द झाले आहे. कोल्हापूरमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात या निर्णयामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. यापुर्वी देखील अशा प्रकारचे निर्णय न्यायालयाने दिलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने तब्बल 20 नगरसेवकांचे पद रद्द केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खलबते चालु आहेत. दरम्यान, रद्द झालेल्या त्या 20 नगरसेवकांच्या प्रभागात फेरनिवडणुक होणार असल्याने इच्छुकांनी मार्चेबांधणी सुरू केली आहे.

कोल्हापूरमध्ये गल्‍ली-बोळात सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाबाबत चर्चा झाली असून त्या 20 नगरसेवकांना हा खुप मोठा दणका आहे. संबंधित नगरसेवक आता काय करणार याकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नगरसेवकांना मोठा दणका बसल्यामुळे दोन्ही पक्षाची मोठी अडचण झाली आहे.

कोल्हापूर महापालिकेतील पक्षीय बलाबल
भाजपा – 13
ताराराणी – 19
काँग्रेस – 27
राष्ट्रवादी काँग्रेस – 15
शिवसेना – 04
अन्य – 02
या नगरसेवकांचं पद रद्द
१. संदीप नेजदार
२. दीपा मगदूम
३. स्वाती येवलूजे
४. हसीना फरास
५. अश्विनी रामाणे
६. किरण शिराळे
७. सचिन पाटील
८. विजय खाडे पाटील
९. नियाझ खान
१०. मनीषा कुंभार
११. अश्विनी बारामते
१२. संतोष गायकवाड
१३. शमा मुल्ला
१४. सविता घोरपडे
१५. वृषाली कदम
१६. रीना कांबळे
१७. गीता गुरव
१८. कमलाकर भोपळे
१९. अफझल पिरजादे