Coronavirus Pune Update : पुणे शहरात आढळले ‘कोरोना’चे नवे 3 रूग्ण, विभागातील संख्या 80 वर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात आज (गुरूवार) दुपारी 2 वाजेपर्यंत कोरोनाचे आणखी 3 नवे सांसर्गिक रूग्ण आढळले असून आता विभागातील संख्या 80 वर पोहचली आहे. त्यामध्ये पुणे-39, पिंपरी-चिंचवड 12, सातारा 2, सांगली 25 आणि कोल्हापूरच्या 2 रूग्णांचा समावेश आहे.

तपासणीसाठी एकुण 1839 नमुने पाठविण्यात आले असून त्यापैकी 1663 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत तर 176 चे अहवाल प्रतिक्षेत आहेत. प्राप्त झालेल्या अहवालांपैकी 1544 नमुने निगेटीव्ह आहेत तर 80 नमुने पॉझिटीव्ह आहेत. आतपर्यंत 18 रूग्ण बरे झत्तल्यामुळे त्यांना रूग्णालयातून सोडण्यात आले आहेत. विभागातील 8119 प्रवाशांपैकी 4214 प्रवाशांबाबत फॉलोअप सुरूआहे. आजपर्यंत 10 लाख 79 हजार 111 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्यामध्ये 48 लाख 72 हजार 779 जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 441 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्तांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

You might also like