home page top 1

ठाण्यात ३ कामगारांचा गुदमरुन मृत्यू

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – सफाई काम करताना ३ कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ठाण्यातील ढोकाली नाका येथे हि घटना घडली आहे. ८ कामगार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची (STP) सफाई करत होते. उर्वरित कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमित पुहल (२० वर्षे), अमन बादल (२१ वर्षे), अजय बुंबाक (२४ वर्षे) या तिघांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

ढोकाली नाका येथे सफाई करण्यासाठी हे सगळे कामगार आले होते. सफाई करत असतानाच या सर्व कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे ३ कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने कामगारांना बाहेर काढण्यात यश आले.

कामगारांची नावे पुढीलप्रमाणे :
अमित पुहल (२० वर्षे), अमन बादल (२१ वर्षे), अजय बुंबाक (२४ वर्षे), वीरेंद्र हातवाल (२५वर्षे), मनजीत वैद्य (२५ वर्षे), जसबीर पुहल (२४ वर्षे), अजय पुहल (२१ वर्षे) रुमर पुहल (३० वर्षे) असे सफाई काम करणाऱ्या कामगारांची नावे आहेत.

प्रशासनाचे दुर्लक्षच :
सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू होण्याच्या घटना काही नवीन नाही. मात्र प्रशासन आणि आणि सरकार या गोष्टींकडे कधी लक्ष देणार आणि या कामगारांच्या सुरक्षेसाठी काही पावले उचलणार आहे कि नाही. न्यायालयानेही अनेकदा सरकारला याप्रकरणी फटकारले आहे. मात्र, सरकार आणि प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही, असेच दिसत आहे.

Loading...
You might also like