अनधिकृतपणे काम करतायत ‘ते’ ३२ पोलीस अधिकारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात ३२ पोलीस अधिकारी अनधिकृतपणे काम करत असल्याचे समोर आले आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी यासंदर्भातील यादी हे अधिकारी अनधिकृतपणे कार्यरत असल्याचे पत्र, महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडे पाठवली आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील वाद शमत नसल्याचे समोर आले आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयात अनधिकृतपणे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये १ पोलीस निरीक्षक, २३ सहाय्यक पोलीस निरीक्षक तर ८ पोलीस उप निरीक्षकांचा समावेश आहे.

पिंपरी चिंचवड आयुक्तालयात ३२ पोलीस अधिकारी अनधिकृतपणे कार्यरत असल्याचे पत्र पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालकांकडे पाठवले आहे. या पत्रामुळे पुणे पोलीस आयुक्तालयातून पिंपरी आयुक्तालयात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून त्यांची द्विधा मनस्थिती झाली आहे.

पिंपरी चिंचवड आयुक्तालयाची निर्मिती झाल्यानंतर दोन्ही आयुक्तालयांतील मनुष्यबळाचा समतोल साधण्यासाठी करण्यात येणारी प्रक्रिया सुरु आहे. ती सुरु राहणार आहे. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बदल्यांचीही प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे कुणीही अनधिकृतपणे काम करत नाही. यामध्ये वादाचा मुद्दा कुठेही नसल्याचे पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये अनधिकृतपणे कार्यरत असणारे अधिकारी पुढील प्रमाणे… कंसात पद आणि तत्कालीन नेमणुकीचे ठिकाण

मसाजी गणु काळे (पोलीस निरीक्षक, पिंपरी पोलीस स्टेशन), लक्ष्मण निवृत्ती सोनवणे (सहायक पोलीस निरीक्षक, निगडी पोलीस स्टेशन), अन्सार रियाज शेख (सहायक पोलीस निरीक्षक, पिंपरी पोलीस स्टेशन), बाळासाहेब साहेबराव शिंदे ((सहायक पोलीस निरीक्षक, एमआयडीसी पोलीस स्टेशन), संजय आनंदा निकुंभ (सहायक पोलीस निरीक्षक, सांगवी पोलीस स्टेशन), दिपाली अमित मरळे -मोटे (सहायक पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा), विठ्ठल सदाशिव साळुंखे (सहायक पोलीस निरीक्षक, एमआयडीसी पोलीस स्टेशन), सतिश सुरेश कांबळे (सहायक पोलीस निरीक्षक, पिंपरी पोलीस स्टेशन), सुनिल विठ्ठलराव गाडे (सहायक पोलीस निरीक्षक, भोसरी पोलीस स्टेशन), गणेश जयसिंग धामणे (सहायक पोलीस निरीक्षक, हिंजवडी पोलीस स्टेशन), कैलास नामदेव राऊत (सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस स्टेशन), गणेश सुधाकर पाटील (सहायक पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा), रामदास झुंबर मुंढे (सहायक पोलीस निरीक्षक, पिंपरी पोलीस स्टेशन), संतोष श्रीमंत घोळवे (सहायक पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस स्टेशन), दिगंबर पांडुरंग सुर्यवंशी (सहायक पोलीस निरीक्षक, पिंपरी पोलीस स्टेशन), उमेश नानासाहेब लोंढे (सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस स्टेशन), महेंद्र पंढरी कदम (सहायक पोलीस निरीक्षक, दिघी पोलीस स्टेशन), विरेंद्र विष्णू चव्हाण (सहायक पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस स्टेशन), तानाजी शंकर भोगम (सहायक पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस स्टेशन), आनंद महादेव पगारे (सहायक पोलीस निरीक्षक, हिंजवडी पोलीस स्टेशन), राजेंद्र मधुकर गिरी (सहायक पोलीस निरीक्षक, दिघी पोलीस स्टेशन), महेश रामेश्वर स्वामी (सहायक पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस स्टेशन), अलका दामोदर सरग (सहायक पोलीस निरीक्षक, सांगवी पोलीस स्टेशन), नारायण अश्रुबा मिसाळ (सहायक पोलीस निरीक्षक, निगडी पोलीस स्टेशन), भुजबळ शिवाजी शंकर (पोलीस उप निरीक्षक, दिघी), माने हरिदास विठ्ठलराव (पोलीस उप निरीक्षक, वाकड), बाबर सिद्धनाथ भगवान (पोलीस उप निरीक्षक, वाकड), रोहिणी जयकर ढेरे (पोलीस उप निरीक्षक, चिंचवड), रत्नमाला त्रिंबक सावंत (पोलीस उप निरीक्षक, एमआयडीसी भोसरी), बोचरे हरिदास शिवराम (पोलीस उप निरीक्षक, पिंपरी चिंचवड मनपा अतिक्रमण), काळू कमाजी लोहकरे (पोलीस उप निरीक्षक, निगडी प्राधिकरण)

संभाजी भिडे ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ चालवतात