Coronavirus : मुंबईत 24 तासात 324 नवे रूग्ण अन् 13 जणांचा मृत्यू, आतापर्यंत 5194 ‘कोरोना’बाधित तर 204 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशात आणि महाराष्ट्रात देखील दिवसेंदिवस कोरोनाच्या बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबईतील बाधितांची संख्या लक्षणीय आहे. गेल्या 24 तासात मुंबईत तब्बल 324 नवीन कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत तर 13 जणांचा दिवसभरात मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या आता तब्बल 5194 वर गेली आहे. आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळं 204 जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, आतापर्यंत 897 बाधित रूग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामध्ये आज दिवसभरात उपचारानंतर बर्‍या झालेल्या 135 रूग्णांचा समावेश आहे.