स्वातंत्र्य दिन : 15 ऑगस्टला PM मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी क्वारंटाइन झाले 350 पोलीस अधिकारी

नवी दिल्ली : देश-परदेशात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा परिणाम सर्वच गोष्टींवर होत आहे. स्वातंत्र्य दिनाचा समारंभसुद्धा यातून सुटलेला नाही. कोरोना व्हायरसचा संसर्ग पाहता यावेळेला स्वातंत्र्य दिनाची खास तयारी केली जात आहे. या अंतर्गत 15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी कार्यक्रमात सहभागी होणार्‍या 350 पोलीसांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

दिल्ली कँटमध्ये आता नवी पोलीस कॉलनी उभारण्यात आली आहे. ती मोठ्याप्रमाणात रिकामी आहे. अनेक कुटुंब अजूनही तेथे शिफ्ट झालेली नाहीत. या रिकाम्या फ्लॅट्समध्ये या 350 पोलिसांना ठेवण्यात आले आहे. 350 पोलिसांमध्ये कॉन्सटेबल रँकपासून डीसीपी रँकपर्यंतचे पोलीस अधिकारी सहभागी आहेत. या सर्व पोलीसांना जगापासून दूर ठेवले आहे. रोज त्यांच्या शरीराचे तापमान नोंदले जात आहे. सोबतच कोरोना व्हायरस लक्षणांची तपासणी केली जात आहे.

याबाबत वरिष्ठ सिनियर अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, हे पाऊल 15 ऑगस्टला सर्व लोकांची सुरक्षा लक्षात घेऊन उचलण्यात आले आहे. आम्ही सर्व प्रकारची काळजी घेत आहोत. सर्वजण क्वारंटाइन झालेले आता 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. कॉम्प्लेक्सच्या आत सर्वजण सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आहेत. कुणातही कोरोनाची लक्षणे नाहीत.