Coronavirus : पुणे विभागात 3742 कोरोनाबाधित रूग्ण तर आतापर्यंत 1503 उपचारानंतर झाले बरे

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – पुणे विभागातील 1 हजार 503 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 742 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 2 हजार 43 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 193 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 128 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 3 हजार 258 बाधीत रुग्ण असून 1 हजार 358 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 730 आहे. कोरोनाबाधित एकूण 170 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 117 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

सातारा जिल्ह्यातील 123 कोरोना बाधीत रुग्ण असून 35 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 86 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 299 कोरोना बाधीत रुग्ण असून 72 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 208 आहे. कोरोनाबाधित एकूण 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील 41 कोरोना बाधीत रुग्ण असून 29 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 21 कोरोना बाधीत रुग्ण असून 9 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 37 हजार 381 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 35 हजार 142 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 239 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 31 हजार 367 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 3 हजार 742 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील 99 लाख 13 हजार 60 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4 कोटी 28 लाख 80 हजार 229 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 452 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.