प्रजासत्ताक दिनीच आसाममध्ये सलग 4 बॉम्बस्फोट

वृत्तसंस्था : प्रजासत्ताक दिना दिवशी आसामच्या वरील भागात एकानंतर एक असे चार बॉम्बस्फोट झाले. मिळालेल्या माहितीनुसार दोन बॉम्बस्फोट डिब्रूगडमध्ये, एक सोनारी आणि इतर एक स्फोट दुलियाजनमधील पोलिस स्टेशन जवळ झाला आहे. दरम्यान, बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही.

आसामच्या डिब्रूगडमध्ये बॉम्बस्फोट राष्ट्रीय राजमार्ग 37 वरील एका दुकानाजवळ झाला आहे. पोलिस आणि इतर तपास यंत्रणेचे अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. आसामचे पोलिस महासंचालक भास्कर ज्योति महंत यांनी सांगितले की, त्यांना डिब्रूगडच्या स्फोटाबाबत माहिती मिळाली आहे. प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून यामागे कोण आहे याचा शोध घेतला जात आहे.

You might also like