जम्मू-काश्मीर : अनंतनागमध्ये लष्कर-दशतवाद्यांमध्ये चकमक, 4 आतंकवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये भारतीय लष्कर आणि दशतवादी यांच्यात चकमक झाली. असे सांगण्यात येत आहे की भारतीय लष्करांकडून आतापर्यंत 4 दहशतवाद्यांना मारण्यात यश आले. अद्यापही चकमक सुरु आहे. दहशतवादी कारवाया पाहता भारतीय लष्कराने संपूर्ण परिसराला घेरले आहे आणि सर्च ऑपरेशन सुरु आहे.

माहितीनुसार अनंतनाग स्थित वटरीगाममध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. गुप्त माहितीनुसार जेव्हा परिसराला घेरण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. बराच वेळ चकमक सुरु होती. त्यात 4 दहशतवाद्यांना मारण्यात आले. अद्यापही गोळीबार सुरु आहे आणि एक दहशतवादी त्याच परिसरात लपलेला आहे.

भारतीय लष्कराने पूर्ण परिसर घेरलेला आहे आणि प्रत्येक घरात सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. मागील आठवड्यात शोपिया सेक्टरमध्ये चकमक झाली होती. त्यात लष्कर ए तैयबाचे 2 दहशतवादी मारले गेले होते. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख शब्बीर अहमद मलिक उर्फ अबू माविया उर्फ वदीना मेलोहरा निवासी अमीर अहमद डार अशी झाली आहे. पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन दहशवादी मलिक दक्षिण काश्मीरमध्ये विविध दहशतवादी घटनेत सहभागी होत होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like