गुजरातहुन जिल्ह्यात येणारा लाखो रुपयांचा गुटखा पिंपळनेर पोलीसांकडून जप्त

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पिंपळनेर पोलीसांनी नाकाबंदी करुन लाखों रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. मिनी ट्रकसह चालक प्रेम रामचंद्र मोटवाणी (वय 38, सरत, गुजरात) याला अटक केले आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, धुळे तालुक्यातील पिंपळनेर गावात पिंपळनेर ते नवापुर मार्गावर निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नाका बंदी करण्यात आली होती. नाक्यावर वाहन तपासणी सुरु असताना नवापुर मार्गाने पिंपळनेर कडे मिनी ट्रक (क्रं.एम एच 18/ ए ए 4002) जात असताना त्याची तपासणी करण्यात आली. तपासणी वेळी ट्रकरमधून उग्र वास येत होता. चालक मोटवाणी याला विचारपुस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यानंतर गाडीसह चालक मोटवाणीला पोलीस ठाण्यात नेले. ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये प्लास्टिकच्या बँगेत केसर युक्त विमल पानमसाल्याच्या एकुण 12 गोण्या व v-1 तंबाखुच्या 12 गोण्या एकून 24 गोण्या असा एकून 5 लाख 28 हजार रुपयांचा महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला माल सापडला. चालक प्रेम रामचंद्र मोटवाणी सुरत, गुजराज येथील राहणारा आहे. पुढील तपास पिंपळनेर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागिय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, सपोनि पंजाबराव राठोड व पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड यांनी केली.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी