मिरजमधील गणेश मिरवणूक हाणामारीच्या प्रकरणात ५ जणांना अटक

मिरज : पोलीसनामा ऑनलाईन

मिरज येथील बसवेश्‍वर चौकामध्ये घरगुती गणपती घेऊन जाताना नगरसेविका संगीता हारगे व माजी सभापती महादेव कुरणे यांच्या दोन गटात गुरूवारी दुपारी तुंबळ हाणामारी झाली होती. याप्रक़रणी अभिजित कुरणे, रावसाहेब कुरणे, शंकर मल्लाप्पा कुरणे, सुशांत रावसाहेब हारगे, अनिल हारगे या पाच जणांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
[amazon_link asins=’B07417987C,B075FY4RWK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’15718df1-b839-11e8-8e2d-bd694d46da5b’]

याबाबत दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी देण्यात आल्या होत्या. हारगे व कुरणे या दोन्ही गटांचे घरगुती गणपती एकाच मार्गावरून येत असताना फटाके उडविणे व वाहने पुढे घेण्याच्या कारणातून हाणामारी झाली. त्या हाणामारीत चाकु, काठ्या, दगड, वायरचा वापर करण्यात आला. या हाणामारीत काहीजण जखमी झाले. रात्री दोन्ही गटाने परस्पर विरोधी तक्रारी दिल्या आहेत.
[amazon_link asins=’B07D9G1GHB,B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1c84ec9a-b839-11e8-8b7e-2faa4e27818f’]

राधिका मिलिंद हारगे यांच्या तक्रारीवरून 29 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सारीका बसगोंडा हारगे यांच्या तक्रारीवरून 38 जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला. आज याप्रकरणी अभिजित कुरणे, रावसाहेब कुरणे, शंकर मल्लाप्पा कुरणे, सुशांत रावसाहेब हारगे, अनिल हारगे या पाच जणांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान या घटनेनंतर बसवेश्‍वर परिसरामध्ये पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या घटनेनंतर आज पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी मिरज पोलिस अधिकार्‍यांना खबरदारीच्या सुचना दिल्या.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी